Thursday, 18 August 2011
Wednesday, 17 August 2011
आरसा कालचा ...(गझल)
वृत्त- स्त्रग्विणी
(गालगा गालगा गालगा गालगा)
दावला मी मला आरसा कालचा
बदलला चेहरा हा कसा कालचा?
हरवली वाट माझी धुके दाटले
शोधितो मी जरा कवडसा कालचा
काय सांगू कुणा? कोणाला आळवू?
घेतला टाकलेला वसा कालचा
पार्थ मी शस्त्र नाकारणारा रणी
सांगण्या कृष्ण यावा जसा कालचा
जाहलो राख मी थंड आता जरी
पेटत्या अग्निचा अंशसा कालचा
.......... वैभव आलीम (१२/०८/११)
पहाटवारा सांगत होता
गीत प्रीतीचे गात होता
साथीने तुझ्या बहरत होता
चांदण्याला आज उत आला
पहाटवारा सांगत होता
केसांत मोगरा माळला होता
रूपाने नभी चंद्र लाजला होता
रातराणीचा सुगंध भरला
पहाटवारा सांगत होता
श्वासात मिसळला श्वास होता
किर्रर्र रातीचा आभास होता
समुद्र होता उधाणलेला
पहाटवारा सांगत होता
चंद्र मावळतीला झुकला होता
ध्रुवतारा गगनी चमकला होता
गोडवा सैलावणाऱ्या मिठीतला
पहाटवारा सांगत होता
.......... वैभव आलीम (१३/०८/११)
Friday, 5 August 2011
दु:ख (गझल)
वृत्त-भुजंगप्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)
मला दु:ख काही तसे फार नाही
मनाने कधी मानली हार नाही
अधूरी जरी राहिली जीत माझी
नशीबा कधी तुजवरी भार नाही
कधीही कुणी येवुदे उंबर्याशी
घराचे कधी झाकले दार नाही
तुला काय सांगू नशीबा कथा मी
मरूनी जगावे व्यथा फार नाही
जरा थांब रे जीवना आजसाठी
नव्याने कधी जन्म घेणार नाही
....... वैभव आलीम (३१/०७/११)
Thursday, 4 August 2011
माझी प्रिया
जराशी हासरी
जराशी लाजरी
वर्णाने सावळी
डोळ्यांत काजळी
रूपाने गोजिरी
थोडीशी बावरी
केसांच्या बटांना
जागा चेहऱ्यावरी
हाती कंगणांचा
खणखणाट भारी
पायांत पैंजणे
रुणझुण करी
थोडीशी लहरी
माझी स्वप्नपरी
हास्य तिचे असे
जणू निर्झरापरी
अशी माझी प्रिया
सर्वांहून न्यारी
.......... वैभव आलीम (०२/०८/११)
Subscribe to:
Posts (Atom)