Wednesday 17 August 2011

पहाटवारा सांगत होता



गीत प्रीतीचे गात होता 
साथीने तुझ्या बहरत होता 
चांदण्याला आज उत आला 
पहाटवारा सांगत होता 


केसांत मोगरा माळला होता 
रूपाने नभी चंद्र लाजला होता 
रातराणीचा सुगंध भरला 
पहाटवारा सांगत होता 


श्वासात मिसळला श्वास होता 
किर्रर्र रातीचा आभास होता 
समुद्र होता उधाणलेला 
पहाटवारा सांगत होता 


चंद्र मावळतीला झुकला होता 
ध्रुवतारा गगनी चमकला होता 
गोडवा सैलावणाऱ्या मिठीतला 
पहाटवारा सांगत होता 

.......... वैभव आलीम (१३/०८/११)

No comments:

Post a Comment