Wednesday 17 August 2011

आरसा कालचा ...(गझल)



वृत्त- स्त्रग्विणी
(गालगा गालगा गालगा गालगा)


दावला मी मला आरसा कालचा 
बदलला चेहरा हा कसा कालचा?


हरवली वाट माझी धुके दाटले 
शोधितो मी जरा कवडसा कालचा 


काय सांगू कुणा? कोणाला आळवू?
घेतला टाकलेला वसा कालचा 


पार्थ मी शस्त्र नाकारणारा रणी
सांगण्या कृष्ण यावा जसा कालचा 


जाहलो राख मी थंड आता जरी 
पेटत्या अग्निचा अंशसा कालचा 

.......... वैभव आलीम (१२/०८/११)

No comments:

Post a Comment